President

Independence Day Celebration

अति भव्य रॅली काढून स्वातंत्र्य दिन साजरा

स्वातंत्र्य दिनानिमित्त ANM, GNM, B.Sc, PBBSc आणि Physiotherapy च्या विद्यार्थ्यांची भव्य रॅली.

 
आज दि. 15/08/2024 रोजी वैद्यनाथ सर्वांगीण विकास प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग आणि वैद्यनाथ इंस्टीट्यूट ऑफ फिजिओथेरपी मध्ये  १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. सकाळी 7:50 ला संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. सूर्यकांत मुंढे सर, सौ. रेखा सूर्यकांत मुंढे यांच्या विशेष उपस्थितीत झेंडा वंदन झाले. 
त्यानंतर या विशेष प्रसंगी, ANM, GNM, B.Sc, PBBSc नर्सिंग आणि Physiotherapy च्या विद्यार्थ्यांची स्वातंत्र्यदिना निमित्त  भव्य रॅली काढली. परळी चे तहसीलदार मा . श्री. व्यंकटराव मुंडे साहेबांनी हिरवा झेंडा दाखवून रॅली ची सुरुवात केली ,  रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा जोश आणि देशभक्तीचा उत्साह दिसून आला, ज्याने सर्वांच्या हृदयात अभिमानाची भावना जागृत केली.
या वेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. शेख सर, प्राचार्या श्रीमती गुणप्रिय चोपडे, ताई परळीकर, श्री. राम होळंबे सर, डॉ. साद सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
 

रॅलीचे वैशिष्ट्ये

या रॅलीमध्ये विद्यार्थी तिरंगा ध्वज घेऊन उत्साहाने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर घोषणांचा जयघोष करत, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्व आणि त्यागाचा संदेश समाजात पोहोचवला.

रॅलीदरम्यान विद्यार्थी विविध संदेशवाहक फलक आणि पोस्टर्स घेऊन चालत होते, ज्यावर एकतेचे, शांततेचे आणि देशप्रेमाचे संदेश लिहिलेले होते. या रॅलीने परिसरातील लोकांना भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आणि त्यामागील बलिदानाची जाणीव करून दिली.

स्वातंत्र्याचा गौरव

रॅलीनंतर महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं गायली आणि भाषणे केली. या दिवशी आम्ही सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व समजून घेतले आणि आपल्या देशाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला.

आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे, अशीच सदिच्छा आहे. चला, एकत्र येऊन आपल्या भारताचा गौरव वाढवू या!